देश

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत आहे, असा आरोप मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आले. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. या प्रकरणावर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

26 जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील, असं जावडेकर म्हणाले.

पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो, असं जावडेकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

“राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

शेतकऱ्याच्या मुलीचा 24 तास लावणी करुन नवा रेकाॅर्ड; जन्मदात्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या