देश

“भाजपचा पुस्तकाशी काहीही संबंध नाही, लेखकाने क्षमा मागितली आहे”

नवी दिल्ली | ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे वादग्रस्त लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. तसेच, हे पुस्तक देखील मागे घेण्यात आले आहे. अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद देशभरात रंगला आहे. आता याबाबत भाजपने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नाही, असं म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या