Top News मुंबई

महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केलीये. या घटनेनंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

यासंदर्भात प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केलंय. महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय.

प्रकाश जावडेकर म्हणतात, महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही. ही घटना आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देते, त्या काळात माध्यमांना या प्रकारची वागणूक देण्यात येत होती.

दरम्यान पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनलकडून करण्यात आलाय. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झालेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

“गेल्या 20 वर्षात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला”

कोकणामधून शिवसेनेला हद्दपार करणार; नारायण राणेंचं वक्तव्य

कंगणा राणावतच्या अडचणींत वाढ; गीतकार जावेद अख्तर यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या