Prakash Mahajan | नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला. त्यांनी सर्वाधिक महिलांसाठी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होताना दिसत आहे. तलाठी कार्यालयाबाहेर देखील कागदपत्रांसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. अशातच आता मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी काही मुस्लिम महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका असं मोठं वक्तव्य केलं आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मुस्लिम समाजात 2 पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होऊ देऊ नका असं वक्तव्य केलं आहे. तसेच एका पेक्षा जास्त पत्नी असलेल्या मुस्लिम समाजातील महिलांना देखील या योजनेचा लाभ देऊ नका असं सांगितलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर देखील हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांची अवस्था म्हणजे माँ माली, बाप तेली, बेटे निकले सय्यद अली अशी असल्याचं प्रकाश महाजन म्हणाले आहेत. राहुल गांधी यांचा हिंदू धर्माशी संबंध नाही, त्यांनी आमच्या धर्मावर बोलू नये, असा घणाघात प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला.
नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?
प्रकाश महाजन यांनी मुस्लिम समाजात 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना तसेच दोन बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये. कारण येणाऱ्या काळात लोकसंख्येचा य देशात कधी ना कधी स्फोट होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार लोकसंख्या लोकं नियंत्रित करतात, दोन पेक्षा अधिक अपत्य वाढू देत नाहीत. त्यांच्या कराचा पैसा, जे दोन अपत्य जन्माला घालतात त्य़ांच्यावर का खर्च करायचा. माझं स्पष्ट मत आहे की, ही योजना या लोकांना दिली तर विवाहीत महिलेला दोन अपत्यांची अट अशी असावी की त्याला एक पत्नी आणि एक पती असावा. नाहीतर आपल्या इथं एकाला तीन-तीन पत्नी आहेत त्यांना हा लाभ मिळू नये, असं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले आहेत.
त्यानंतर प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींना देखील टोकलं आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आणि निर्भंध बोलू लागले आहेत. ते हिंदू ध्रर्मावर हिंदू धर्मावर कशाला बोलत असतात? ते हिंदू नाहीत, जो हिंदू आई बापाच्या पोटी जन्माला येतो तो हिंदू आहे. अशा प्रकारे प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.
प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर आमदार बाबाजानी दुर्रानी यांची प्रतिक्रिया
प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे नेते आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश महाजन यांनी केलेलं विधान हे चिप पब्लिसिटी स्टंट आहे. मुळात या योजनेची पार्श्वभूमी पाहता 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी सरकारने योजना अंमलात आणली आहे. शासन सर्व स्तरातील महिलांना याचा लाभ देणार आहे. प्रकाश महाजन सारख्या व्यक्तींची दखल घेणं फार महत्वाचं नाही.
या देशात 15 टक्के मुस्लिम समाज आहे. तर 85 टक्के हिंदू आहेत. यावर मुस्लिम लोकसंख्या वाढते हे साफ चुकीचं वक्तव्य असल्याचं बाबाजानी यांनी केलं आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं बाबाजानी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
News Title – Prakash Mahajan Ladaki Bahin Yojana Don’t Given To Muslim Women Those have More Than Two Child
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!
“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी
‘जोधा अकबर’ फेम परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन; फोटो पाहून म्हणाल..
“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”