Prakash Mahajan | राज्याचा अर्थसंकल्प हा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आणि महायुतीने महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. अनेक महिला याचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र आता या योजनेवरून मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी एक पेक्षा अधिक पत्नी असणाऱ्यांना आणि दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना या योजनेचा लाभ देऊ नये असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
मुस्लिम समाजाचा इतका द्वेश का?
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच प्रकाश महाजन यांना प्रश्न केला. आव्हाड यांना मुस्लिम समाजाचा इतका द्वेश का? असा सवाल केला. त्यावर आता या देशाच्या प्रत्येक संसाधनावर आणि शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा असला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी प्रत्युत्तर म्हणून दिली आहे. ते नाशिकच्या मालेगाव येथे बोलत होते.
यात कोणताही मुस्लिम समाजाचा द्वेश नसल्याचं सांगितलं आहे. मुस्लिम समाजाबाबतीत लाडकी बहीण योजनेला घेऊन काही त्रूटी काढल्या त्यात मुस्लिम समाजाचा द्वेश कुठून आला? असा सवाल प्रकाश महाजन यांनी आव्हाड यांना केला आहे. भारतीय सैन्यदलात, पोलीस दलात सर्वाधिक हिंदूच आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतांवर निवडून येत असल्याने त्यांच्या नसानसात हिंदू द्वेश आहे, असं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले आहेत.
लाडकी बहीण योजनेत महिलांना सरकार 1500 रूपये मासिक आर्थिक मदत करणार आहे. यामुळे महिलांना फुल ना फुलांची पाकळी मदत होणार आहे. तसेच महिलांना अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस मोफत दिले जाणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव डोळ्यासमोर आणता. महायुतीने अर्थसंकल्पात सकारात्मक फायदा होईल असे निर्णय घेतले आहेत.
काय म्हणाले होते प्रकाश महाजन?
मुस्लिम समाजात 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना तसेच दोन बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये. कारण येणाऱ्या काळात लोकसंख्येचा या देशात कधी ना कधी स्फोट होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार लोकसंख्या लोकं नियंत्रित करतात, दोन पेक्षा अधिक अपत्य वाढू देत नाहीत. त्यांच्या कराचा पैसा, जे दोन अपत्य जन्माला घालतात त्य़ांच्यावर का खर्च करायचा. माझं स्पष्ट मत आहे की, ही योजना या लोकांना दिली तर विवाहीत महिलेला दोन अपत्यांची अट अशी असावी की त्याला एक पत्नी आणि एक पती असावा. नाहीतर आपल्या इथं एकाला तीन-तीन पत्नी आहेत त्यांना हा लाभ मिळू नये, असं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले आहेत.
News Title – Prakash Mahajan Replied To Jitendra Awhad Over Ladki Bahin Yojana News Update
महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवुडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; राज कपूर-देवानंद यांच्यासोबत केलंय काम
एसबीआय बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; लगेचच करा अर्ज
“गौतम अदानींना जमीन देण्यास विरोध केल्यानेच…”; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज
“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”