मुंबई | भाजपचे नेते प्रकाश मेहता यांची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी भाजपकडून पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.
मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पहायला मिळाला. मेहतांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शहांची गाडी फोडून राग व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांची समजूत घालणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना देखील यावेळी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचं कळतंय.
दरम्यान, घाटकोपरमध्ये झालेल्या राड्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
टिक-टॉक स्टारला लॉटरी; भाजपकडून मिळाली विधानसभेची उमेदवारी- https://t.co/Ah1tnVpPRU #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
मनसेला दुसरा मोठा धक्का; काल शिवसेनेकडून अन् आज भाजपकडून! https://t.co/dKnicamFNC @mnsadhikrut
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
विद्यार्थ्यांचे विनोद तावडेंना टोमणे; ‘आता कसं वाटतंय लिस्टमध्ये नाव नसल्यावर…!’ https://t.co/gbilOpUImb @TawdeVinod
— थोडक्यात (@thodkyaat) October 4, 2019
Comments are closed.