महाराष्ट्र मुंबई

‘मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही’; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ भाजप नेत्याचा निर्धार

मुंबई | एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

पक्षात कोणतेही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. एका व्यक्तीला दोष देऊन आपण पळवाट काढावी हे योग्य नाही, असं म्हणत प्रकाश मेहता यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या उभारणीमध्ये खडसेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आज सुद्धा पक्षात राहून काम करावं अशी माझी इच्छा आहे. मात्र खडसेंनी त्यांचा निर्णय घेतला आहे. त्यांना आमच्याकडून शुभेच्छा, असं मेहता म्हणालेत.

खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या वाट्याला अशी दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती येऊ नये असं वाटतं, असं प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं”

कोण आहे ‘तो’ भाजपचा नेता, फक्त त्यानंच एकनाथ खडसेंना फोन केला!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भाजप सोडताना एकनाथ खडसे आक्रमक; देवेंद्र फडणवीसांवर केले ‘हे’ धक्कादायक आरोप

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या