भाजप खासदारावर अभिनेते प्रकाश राज यांचा अवघ्या 1 रुपयाचा खटला!

मुंबई | सिंघम चित्रपटातील व्हिलन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी भाजप खासदाराला कोर्टात खेचलं आहे. प्रकाश राज यांनी खासदार प्रताप सिन्हांवर मानहानीचा खटला दाखल केला असून तो खटला फक्त एक रुपयाचा आहे.

बदनामी केल्याचा आरोप करत प्रकाश राज यांनी खासदार प्रताप सिन्हावर आब्रुनुकसानीचा दावा केला. 

प्रकाश सिन्हा यांनी 2017 साली अभिनेता प्रकाश राज यांच्या संबंधित काही अपमानकारक  पोस्ट केल्या होत्या, त्यामुळे  प्रकाश राज यांनी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितलं.