मोदीजी तुमचा खरा चेहरा नेमका कुठला?- प्रकाश राज

बंगळूरू | पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलोड्रामा करतात, अशी टीका अभिनेते प्रकाश राज यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून दोन व्हीडिओ शेअर करत मोदींवर निशाणा साधला आहे. 

पहिला व्हीडिओ हा 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पुल कोसळला होता त्यावेळी मोदींनी दिलेल्या भाषणाचा आहे. त्यात मोदी मायावती सरकारवर टीका करत आहेत. दुसरा व्हीडिओ 2018मध्ये स्वतःचा मतदारसंघ वाराणसीत पुल कोसळून 18 लोक मरण पावले होते, त्यावेळचा आहे. त्यात त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘प्रिय सुप्रीम लीडर, तुमच्या पक्षाची सत्ता नसलेल्या राज्यात एखादी दुर्घटना घडते तेव्हा तुम्ही द्वेष पसरवता, आणि तशीच दुर्घटना तुमच्या मतदारसंघात घडते तेव्हा तुम्ही मेलोड्रामा करता. या दोन्ही पैकी तुमचा खरा चेहरा कुठला आहे ते आम्हा सर्व नागरिकांना जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला तिसरा चेहरा देखील आहे, असं ट्वीट प्रकाश राज यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | एम. जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला होता!

-सुरक्षारक्षक असूनही भाजप नेत्याची आणि त्यांच्या भावाची गोळ्या झाडून हत्या!!!

-भाजपच्या चिंतेत भर टाकणारी बातमी; राहुल गांधी आणि चंद्राबाबू एकत्र

-राम मंदिरासाठी जमवलेल्या विटा राम मंदिरासाठी नव्हत्याच!

-कर्नाटक पोलिसांनी मुजोरी; मराठी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज