मोदींविरोधात टीका, गोमूत्र शिंपडून पवित्र केलं व्यासपीठ!

कारवार | मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे अभिनेते प्रकाश राज यांनी भाषण केलेलं व्यासपीठ चक्क गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात आलं. कर्नाटकमधील सिरशी गावात भाजपयुमोच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे प्रकाश राज संतप्त झालेत. भाजप सरकार तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. सिरशीमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनाही लक्ष्य केलं. 

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना ही टीका सहन झाली नाही. त्यांनी कार्यक्रमाच्या मंडपात तुळस ठेवली तसेच गोमूत्र शिंपडून हा मंडप पवित्र केला.