बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली | सध्या पेट्रोलच्या दराने काही राज्यांत 100 ओलांडली आहे तर काही राज्यांत आता काहीच दिवसात गाठण्याची शक्यता आहे. जनतेच्या मनातसुद्धा इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सर्वसामान्यांचं शोषण करताना सरकारला लाज वाटायला हवी, अशा तिखट शब्दात प्रकाश राज यांनी वाढत्या इंधन दरावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रकाश राज यांनी ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक गोष्टींची वाढ कशा प्रकारे होत गेली याची माहिती दिली आहे तर सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे.

गेल्या तीन महिन्यांत गॅसची किंमत 225 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे, असंही प्रकाश राज यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी भाजपचे कर्नाटकातील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील व्हिडीओ क्लीप सापडल्यावरूनही प्रकाश राज यांनी टीका केली आहे. हा लाजीरवाण असल्याचं प्रकाश राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रमेश जारकीहोळी यांचा एक अश्लील व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका महिलेला कर्नाटक पाॅवर ट्रान्समिशन काॅर्पोरेशन लिमीटेडमध्ये नोकरी देण्याचं अमिष दाखवून ते पूर्ण न केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातलं अंतर लक्षात आलेलं नाही- देवेंद्र फडणवी

धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन

धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगली, आता सुटला निर्दोष…

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More