मुंबई | भाजपमध्ये 37 आमदारांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. त्यांना कुठलाही अधिकार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ओबीसी नेत्यांचा त्रास वाढला. आदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास दिला जात आहे, असं भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंना तिकीट देऊन पाडलं. अनिल गोटेंचा साधा पोस्टरही भाजप लावत नाही. त्यांचीही तिकीट कापलं. तर दुसरीकडे गणेश हाकेंचे हाल केले. अनेक ठिकाणी आयात करून उमेदवार देण्यात आले. बाळासाहेब सानप यांचीही मुस्कटदाबी केली. याबाबत बावनकुळेंना सगळं माहीत आहे, असंही शेंडगे म्हणाले.
पंकजा मुंडे ओबीसी असल्याने त्यांचं भाजपत खच्चीकरण केलं जातंय. भाजपने कायमच ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला प्रकाश शेंडगेंनी काही दिवसांपुर्वी दिला होता.
हा सगळा प्रकार पाहता आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही 12 तारखेला एकत्र बसून घेऊ. येत्या 12 तारखेला आम्ही मोठा निर्णय घेणार आहोत, असंही शेंडगे म्हणाले आहेत. त्यामुळे 12 तारखेला नक्की काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“रोहिणी खडसेंचा पराभव करणाऱ्यांविरोधातले पुरावे घेऊन दिल्लीत आलोय” https://t.co/OUh7ctjLhI @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 9, 2019
एकनाथ खडसे जनपथ 6 वर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण https://t.co/BiMpm19Cwf @EknathKhadseBJP @PawarSpeaks @BJP4Maharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 9, 2019
भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी एकनाथ खडसेंनी मागितली वेळ; दिल्ली दरबारी खडसेंची नाराजी दूर होणार? https://t.co/MUwhIXFVgZ @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 9, 2019
Comments are closed.