Loading...

“पंकजा मुंडे ओबीसी असल्याने त्यांचं खच्चीकरण केलं जातंय, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा”

मुंबई | पंकजा मुंडे ओबीसी असल्याने त्यांचं भाजपत खच्चीकरण केलं जातंय. भाजपने कायमच ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं मत भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपने मांडला होता. मात्र आम्ही त्याला वेळीच विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला. पंकजा मुंडे यांना परळीतून भाजपनेच पाडलं. त्यामुळे त्यांनी वेळीच सावध व्हावं आणि याग्य निर्णय घ्यावा, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.

Loading...

मी भाजप सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नाही असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण भाजपच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मी भाजपची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलंय आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, प्रकाश शेंडगे यांनी 2014 मध्ये भाजपशी रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत ओबीसी संघटनेची बांधणी सुरू केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...