बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा”

मुंबई | ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयात (SC) झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी म्हणजेच इम्पेरिकल डेटा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण देखील तापल्याचं दिसतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. अशातच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारला राजकीय शिक्षण नाही. जर आमच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

सारथीला 1 हजार कोटी देता आणि आम्हाला पाच कोटी का?, असा सवाल देखील प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. सरकारचं रिमोट कंट्रोल ज्यांच्या हाती आहे. त्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही. इथं झारीचे अनेक शुक्राचार्य आहेत, अशी टीका देखील प्रकाश शेंडगे यांनी शरद पवारांवर केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारने आता युद्धपातळीवर डाटा गोळा केला पाहिजे. केंद्राकडे बोट दाखवता ही तुमची देखील जबाबदारी आहे, अशी टीका प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून आता राज्याचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

फडणवीस म्हणतात, “…तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती”

“केंद्र सरकार न्यायालयाला खोटं बोलतंय की संसदेला?”

न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More