महाराष्ट्र मुंबई

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…..”

मुंबई | ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. तसेच मुख्यमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन करु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

आज मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतरिम सुनावणी झाली. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर ओबीसी समाजाचीही बाजू मांडायलाच हवी, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची अंतिम सुनावणी सुरु आहे. पण, ओबीसी समजाचं काय? हे सरकारही आमच्याकडे दुर्लक्षच करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, म्हणून त्यांना भेटीसाठी वेळ मागितली आहे. जर असं झालं नाही, तर 20 ते 25 तारखेपर्यंत आंदोलन करणार, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. राज्य सरकारने आमची बाजू मांडायलाच हवी, अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी ताळतंत्र सोडलं ”

‘कोरोना झाल्यास मला सरकारी रूग्णालयातच दाखल करा’; देवेंद्र फडणवीसांनी केला ‘या’ नेत्याला फोन

2019 वर्ल्डकपच्या शेवटी ताण कमी करण्यासाठी बेन स्टोक्सने केलं असं काही…..

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शहा म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या