मुंबई | एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाष्य करत भाजपवर आरोप केलेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
मी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली असता, माझ्यावर पक्ष सोडायची वेळ आणली. माझं तिकीट कापण्यात आलं, असा गंभीर आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते. एकनाथ खडसेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मी मागणी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं आहे.
या मागणीमुळे माझं तिकीट कापण्यात आलं. आता तीच वेळ एकनाथ खडसेंवर आली आहे, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या…
थिल्लर-चिल्लरकडे बघायला मला वेळ नाही- उद्धव ठाकरे
“एकनाथ खडसे आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावं”
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, म्हणाले…
Comments are closed.