महाराष्ट्र मुंबई

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

मुंबई | जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय.

मराठा आरक्षण तसंच नोकरभरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रकाश शेंडगे यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेते आणि संघटनांवर टीका केलीये.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असं प्रकाश शेंडगे म्हणालेत.

दरम्यान, ओबीसी आरक्षण बचावासाठी 3 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”

दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…

“आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाणांचा देखील आहे”

“पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे”

“मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या