महाराष्ट्र मुंबई

“धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु”

मुंबई | धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

ओबीसी समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही नेहमीच केली. मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचं षडयंत्र झालं आहे. सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही, ही कल्पना पूर्वीच होती आणि तेच घडलं. ओबीसी आणि मराठ्यांचा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता यापूर्वीही होती, जे सांगितलं तेच घडलं, असं शेंडगे म्हणालेत.

ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहे, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, आमचा विरोध केवळ मराठा आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याला आहे, अशी भूमिका OBC नेत्यांनी मांडली

दरम्यान, आता मराठ्यांना आरक्षण कुठून देणार, हे कुणालाच ठाऊक नाही, मार्ग निघणं कठीण आहे, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!

“हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र, सूर्याइतकीच लख्ख आहे”

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर…- कंगणा राणावत

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- दादा भुसे

‘आमचं वेतन घ्या पण…’; खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली ही विनंती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या