Top News

कृषी कायद्याविरुद्ध प्रकाश सिंह बादल आक्रमक, ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करणार

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.

केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं प्रकाश सिंह बादल यांनी सांगितलं आहे.

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलानं NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या कुटुंबियांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

“महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम”

मुंबईकरांसाठी 15 डिसेंबरनंतर लोकलसेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार!

“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या