“बीडचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो”

बीड |  बीडमध्ये एकदा वंचित बहुजन आघाडीचा खासदार निवडून द्या, RSS वाल्यांना कायमचं जेलमध्ये टाकतो, असं वक्तव्य भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आरएसएस आणि भाजपचा इतिहास दंगलीचा आहे. निवडणुकीच्या अगोदर दंगली घडवणं हेच यांचं एकमेव आंदोलन आहे, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे. बीडमध्ये आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

मोहन भागवतांकडे AK-47 आहे. त्यांना अगोदर अटक करा. आम्हाला एक न्याय आणि त्यांना एक न्याय, हे या देशात आता चालणार नाही; अशा शब्दांत त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

दरम्यान, वंचित-बहुजनांना सत्तेत आणण्यासाठी कटीबद्ध रहा, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारे गुजरात ठरले पहिले राज्य

-अंबाती रायडूच्या बॉलिंग अ‌ॅ‌‌‌‌‌‌‌‌‌‌क्शनवर पंचांनी उपस्थित केले प्रश्न ‌

-एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे