मी तोंड उघडलं तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल!

मुंबई | मी तोंड उघडलं तर शरद पवारांना पळता भुई थोडी होईल, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते भारिपच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलत होते. 

शरद पवार हे प्रचंड जातीयवादी आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा डाव्या पक्षांसोबत जाऊ, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. 

दरम्यान, 2001 साली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेच गृहमंत्रीपद होतं, मात्र त्यावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरुनच मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या संघटनेवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.