…तर माझ्यासकट शरद पवारांना जेलमध्ये घालावं लागेल!

मुंबई | रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागेल, हे वाक्य प्रक्षोभक असेल तर माझ्यासकट शरद पवारांना जेलमध्ये घालावं लागेल, असं भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्यावर पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी ते बोलत होते. 

रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागेल, हे वाक्य मी माझ्या भाषणांमध्ये अनेकदा वापरलं आहे. शरद पवारांनीही वापरलं आहे, अगदी तारखेसह मी दाखवून देतो, असं त्यांनी म्हटलंय. जिग्नेश आणि उमरमुळे कोरेगाव भिमा प्रकरण घडल्याचं त्यांनी अमान्य केलं.