प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये- शरद पवार

मुंबई | भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहे, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही, त्याच्या पक्षात भिडेंची पिलावळ आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत, मात्र त्यांच्या मित्रपक्षासोबत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर त्यांनी आंबेडकरांनी अकोल्यात दोन वेळेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता, असंही शरद पवारांनी यावेळी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनसेच्या एकमेव आमदाराची वळसे पाटलांना खासदारकीची आॅफर!

-राष्ट्रवादी तेलंगणात लढवणार निवडणूक?; शरद पवार स्वत: मैदानात

-राजाचा जीव जसा पोपटात असतो, तसा महाडिकांचा गोकुळमध्ये- सतेज पाटील

-राज्यात कायद्याचा धाक उरलाय का नाही? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल

-देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, पंचाग पाहूनच मंत्रीमंडळ विस्तार करतील!