देश

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

Photo Credit- Priyanka Gandhi Twitter

नवी दिल्ली | प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असल्याचं काँग्रेसच्या तिकिटावर संभळमधून लोकसभा निवडणूक लढलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधी या सर्वात मोठ्या हिंदू आहेत. तसेच त्या दुर्गा मातेचा अवतार असून मंदिरात दर्शन करणं, प्रयागमध्ये स्नान करणं, हातांमध्ये रुद्राक्ष घालणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हीडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार असल्याचं म्हटलं आहे.

ज्या प्रकारे प्रियंका गांधी या शाकुंभरी देवीचा आशीर्वाद घेत आहेत, संगममध्ये स्नान करत आहेत, त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा गेली आहे. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे, असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रियंका गांधी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत, अशी चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या-

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”

टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??

…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या