देश

मी घरातूनच काम केलं, तुम्हीही करा- प्रमोद सावंत

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेसाठी सकाळीच संदेश देताना घरातूनच काम करण्याचे कळकळीचे आवाहन केलय.

मी सुद्धा माझ्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीवर मी लक्ष ठेवून आहे आणि आढावा घेत आहे. हद्दीवरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे तसेच आरोग्य सेवेवरही आम्ही नजर ठेवून आहोत, असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

जनता कर्फ्यूच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर मला कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यायला मिळाला. लोकांनीही घरात राहून कुटुंबातील व्यक्तींसोबतच वेळ घालवावा, असं प्रमोद सावंत म्हणाले.

दरम्यान, कोरोना व्हायरसविरूध्द आम्ही एकत्रितपणे लढू, असं आवाहन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

अभिनेत्री पूजा बेदीने खिल्ली ‘जनता कर्फ्यू’ची उडवली खिल्ली; म्हणाली…

‘जनता कर्फ्यू’चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

महत्वाच्या बातम्या-

रेल्वे आणि लोकल पाठोपाठ एसटी देखील बंद राहणार?

काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठींबा; म्हणाले…

“विषकन्या कनिका कपूरवर बहिष्कार टाका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या