नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत खालावली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीबाबत रूग्णालयातर्फे माहिती देण्यात आली. मुखर्जी यांच्यावर आर्मी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला आहे. यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. त्यांना अजूनही व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचं त्यांच्याकडे लक्ष आहे.
यापूर्वी प्रणव मुखर्जी कोमामध्ये गेले असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली होती. 10 ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. या आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही.
काही दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या. ज्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने म्हणजेच अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन माहिती दिली की, माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत. त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
महत्वाच्या बातम्या-
रिया चक्रवर्ती-महेश भट यांचा जुना व्हिडीओ व्हायरल; ‘ते’ दृश्य पाहून नेटकरी संतापल
“शाहरुख खाननं सर्वांसमोर अपमान केल्यानं सुशांत खूपच अस्वस्थ झाला होता”
सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यावर संजय राऊत म्हणाले…
आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी घेणार का?- आशिष शेलार
सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.