दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी तब्येत बरी नाहीये. प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे.
आर्मी रुग्णालयाने प्रणव मुखर्जी यांच्या आरोग्याबाबत ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 10 ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. या आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही.
आज सकाळीच त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या. ज्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने म्हणजेच अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करुन माहिती दिली की माझे वडील प्रणव मुखर्जी सुखरुप आहेत. त्यांच्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रणव मुखर्जी आजारी आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून कर्डीले-विखे पाटील एकत्र; घेतली कृषिमंत्र्यांची भेट
गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘हे’ खास अॅप
ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने राबवली ‘ही’ मोहिम
“एफआयआरने काही होणार नाही संजय राऊत यांना तुरुंगात टाका”
शरद पवारांची पार्थ पवारांवर टीका; फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणतात….
Comments are closed.