Top News

भाजप बॅड लूझर, आज अनेकांना शांत झोप येईल- प्रणिती शिंदे

मुंबई |  आज ठाकरे सरकारचा विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव पार पडला.  169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतं दिली. तर विरोधकांनी म्हणजेच भाजप आमदारांनी मोठा गदारोळ करत सभात्याग केला. यावर भाजप बॅड लूजर आहे. तर आज विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सगळ्या आमदारांना शांत झोप लागेल, असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार यशस्वीपणे 5 वर्ष चालेल. पण फक्त पाचच वर्ष नाही तर आमचं सरकार 30 वर्ष हटणार नाही, असा विश्वासदेखील प्रणिती यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीने संविधान आणि कायदे आज पायदळी तुडवल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर भाजप बॅडलूजर आहे. त्यांनाच कायदे मोडायची सवय आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

आज आपण पाहिलं असेल की बहुमत महाविकास आघाडीच्या  बाजूने आहे तेव्हा लोकांच्या हितासाठी सभागृह चालवणं गरजेचं असल्याचं मत प्रणिती यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, ठाकरे सरकारचा विश्वास ठराव मतदानाला येताच भाजप आमदारांनी संविधानाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. नही चलेगी नही चलेगी…. दादागिरी नहीं चलेगी, अशा घोषणा देत भाजप आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या