Praniti Shinde | आगामी लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. भाजपने नुकतीच पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 111 जणांची नावं आहेत. त्यात महाराष्ट्रातली तीन नावं आणखी आहेत. 48 जागांपैकी महाराष्ट्रात भाजपने 23 जागांवर दावा सांगितला आहे.
यातीलच सोलापूर मतदारसंघातून भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवरच प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिलं आहे. हे पत्र आता चर्चेत आलं आहे.
प्रणिती शिंदेंनी पत्रात काय म्हटलं?
मा. राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते. तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते.
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि मतदारसंघाचा विकसा हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे.
@RamVSatpute जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! pic.twitter.com/ZQHXT7aLAE
— Praniti Shinde (@ShindePraniti) March 25, 2024
पुढील 40 दिवस भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई एकमेकांविरोधात लढत राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि शुभेच्छा देते, असं पत्र प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लिहिलं आहे.
राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे लढाई
आता प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या पत्राला भाजप उमेदवार राम सातपुते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत राम सातपुते यांच्यासोबतच आणखी दोन उमेदवारांची नावे आहेत. भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. तर गडचिरोलीतून अशोक महादेव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
News Title : Praniti Shinde letter to Ram Satpute
महत्त्वाच्या बातम्या –
कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार
पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट
हार्दिकमुळेच मुंबईचा पराभव झाला; इरफानचा संताप, सांगितली घोडचूक!
महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद
नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video