राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

Praniti Shinde | सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार झाल्या आहेत. सोलापूरात प्रणिती शिंदेंनी प्रचारावेळी अनेक मुद्दे मांडले होते. त्यात मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा मांडला होता. त्याची जोरदार चर्चा देखील झाली. सध्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. मात्र अशातच आता शिंदे गटाचे नेते अमोल शिंदेंनी प्रणिती शिंदेंवर (Praniti Shinde) गंभीर आरोप केला आहे.

सत्ताधाऱ्यांचा नेहमीच त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. यावेळी शिंदे गटाच्या नेत्याने हल्लाबोल केला आहे. मराठ्यांची मतं हवी आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको. प्रणिती शिंदेंची (Praniti Shinde) भूमिका ही चुकीची असल्याचं वक्तव्य अमोल शिंदे यांनी केलं आहे.

मनोज जरांगे फॅक्टरमुळे प्रणिती शिंदे खासदार झाल्या

प्रणिती शिंदे या मराठा समाज आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे खासदार झाल्या आहेत. त्यांनी कदापी डोक्यात हवा घालून घेऊ नये की आपण काँग्रेसच्या लोकप्रियतेमुळे खासदार झाला आहात, असं अमोल शिंदे म्हणाले आहेत.

“जरांगे पाटील यांच्यासोबत बुके देऊन त्यांनी फोटो काढत व्हायरल करण्यासाठी त्यांनी आटापिटा केलाय ते सगळ्यांनी पाहिलं आहे. मात्र जरांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणाला प्रणिती शिंदेंनी जाऊन त्याठिकाणी पाठिंबा दिला नाही. मराठ्यांची मते हवी आहेत पण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला, पाठिंबा द्यायला नको”, असं अमोल शिंदे म्हणाले आहेत.

“मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना…”

मराठा समाजाने देखील मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना वेळीच ओळखलं पाहिजे. एकीकडे पंकजा मुंडे या ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना भेटतात, मग प्रणिती शिंदे जरांगे पाटलांना का भेटल्या नाहीत? असा सवाल आता अमोल शिंदे यांनी केला आहे.

अमोल शिंदेंनी प्रणिती शिंदेंवर मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आरोप केला आहे. याला आता प्रणिती शिंदे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

News Title – Praniti Shinde Never Support With Manoj Jarange Patil Shivsena Leader Amol Shinde Statement

महत्त्वाच्या बातम्या

शेअर बाजारने गाठला ऐतिहासिक उच्चांक! काय आहे रेकॉर्ड ओपनिंग लेव्हल

ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मॉन्सूनची गती मंदावली, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?; IMD कडून महत्वाची अपडेट

“शिंदेंना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं”; बच्चू कडूंचा भाजपवर खळबळजनक आरोप

टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळणार? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता