Praniti Shinde | सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला. प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोलापूरात दंगल घडवून आणण्याचा प्लॅन केला असल्याचा दावा आता प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) केला आहे.
प्रणिती शिंदेंनी भाजपची काढली लाज
यावेळी बोलत असताना प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) भाजपची लाज काढली आहे. सोलापूर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर प्रणिती शिंदेंचा कृतज्ञता मेळावा पार पडला होता. यावेळी बोलत असताना प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) भाजप आणि फडणवीसांवर टीकेची तोफ डागली आहे. ही लोकं रक्ताने राजकारण करतात. भाजपवाल्यांना लाज वाटायला हवी होती, असा आरोप आता प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) केला आहे.
त्यावेळी ते गावामध्ये जिल्ह्यातून येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, असा आरोप त्यांनी फडणवीसांवर केला. ते कानात सांगितलं गेलं. त्यावेळी मतदानादिवशी पोलिंगवर काय झालं होत?, सीपींनी सांगितलं होतं, बाहेर जा; नाहीतर उमेदवारावर एफआयआर दाखल करावा लागेल. त्यावेळी भाजपला कळालं होतं की, आता ही निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी फडणवीस आणि त्यांच्या सहाकाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये अंतर काय आहे?
भाजपने संविधान संपवण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यावर आता प्रणिती शिंदेंनी भाजपने केलेल्या संविधानाच्या मुद्द्याला धरून भाजपला धारेवर धरलं आहे. संविधान संपवण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने चपराक लगावली. मग भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये अंतर काय आहे? असा सवाल प्रणिती शिंदेंनी केला.
हे देशात राहून भांडणं लावत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोलापूरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. भाजपने किती पैसे वाटप केले. एक साडी आणि 500 रूपये दिल्याचा आरोप त्यांनी केला, प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
News Title – Praniti Shinde On Devendra Fadanvis About Plan To Create Riots In Loksabha Election Solapur
महत्त्वाच्या बातम्या
राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
“इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट, पण मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”
आमदार दत्तात्रय भरणेंना बनवलं मामा, इमोशन ब्लॅकमेल करत घातला ‘एवढ्या’ हजारांचा गंडा
G7 परिषदेपेक्षाही मोदी आणि मेलोनी यांचीच चर्चा; एका सेल्फीने इंटरनेटवर धुमाकूळ