बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला ‘हैदराबाद’सारखी शिक्षा द्या- प्रणिती शिंदे

सोलापूर | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथल्या प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रकार सोमवारी घडला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा काहीतरी न्याय द्या, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे. हिंगणघाटच्या घटनेप्रकरणी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या.

पीडित मुलीची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल अशी मी प्रार्थना करते. मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा जागीच बंदोबस्त केला पाहिजे. कायदा वगैरे असून या नराधमांची मानसिकता कधी बदलेल, हे माहिती नाही, असं म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांमुळं, ‘भूखंडाचं श्रीखंड’ शब्द महाराष्ट्राला मिळाला- माधव भंडारी

“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”

महत्वाच्या बातम्या-

आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

काँग्रेसची बेरोजगारी कधीच संपू देणार नाही- पंतप्रधान मोदी

फडणवीस दिल्लीत गेले तर महाराष्ट्रालाच फायदा होईल- एकनाथ खडसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More