बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे

सोलापूर | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची माहिती फडणवीस यांच्या हाती लागली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीये. या प्रकरणावर आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करू, असं प्रणिती शिदे म्हणाल्या आहेत. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना UPAच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केलं आहे. राऊतांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचं योगदान मोठं आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या आहेत, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराची थेट पोलीस कोठडीत रवानगी!

दोनदा कोरोना झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आजारी, केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More