बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युपीएससीची परीक्षा क्रॅक करणाऱ्या प्रांजलला कोरोनाने हिरावलं, उपचारादरम्यान मृत्यु

मुंबई | कोरोनाने सध्या संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असून वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह राजकारणी, अभिनेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, दिग्गज व्यक्तीही धोरणामुळे मृत्त पावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पातुर तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा कोरोनाने निधन झालं आहे.

प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न अधूरं राहिलं. कोरोनामुळे फुफ्फुस बाधित झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांनी मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने 55 लाख रुपये जोडून उपचार करण्यासाठी एअर रूग्णवाहिकेने सोमवारी हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला नेण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री 11:15 मिनिटांनी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

उपचारादरम्यान शुक्रवारी प्रांजलचा मृत्यू झाला. प्रांजलने मोठ्या जिद्दीने आणि अथक परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली होती. मात्र तिला कोरानाने गाठलं आणि तिचं जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधुर राहिलं. अकोल्याच्या खाजगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर प्रांजलची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती.

दरम्यान, प्रांजलला उपचारासाठी हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. प्रांजलने बुधवारी डोळे उघडले होते. बाबा आणि दोन्ही काकासोबत प्रांजलने संवाद साधला. काकांनी लवकरच बरं होउन घरी जाऊ असं सांगितलं. परंतु शुक्रवारी दुपारनंतर गुंतागुंत वाढली आणि यातच प्रांजलचा मृत्यू झाला. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने शनिवारी प्रांजलचं पार्थिव अकोल्यात आणण्यात आलं आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाने निधन झालेल्या मोठ्या भावाला मिठी मारून रडला, सकाळी दोघांवर झाले अंत्यसंस्कार

शाब्बास पुणेकरांनो! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर 3000 पेक्षा जास्त डिस्चार्ज

लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात! एका नवरीशी लग्नासाठी आले दोन नवरदेव, त्यानंतर घडलं असं काही की…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मोठी बातमी! काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More