महाराष्ट्र मुंबई

“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”

मुंबई | हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. यावेळी प्रसाद लाड बोलत होते.

जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील असंही प्रसाद लाड म्हणाले.

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन प्रसाद लाड यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी इशारा दिला आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलाबाबतचं विधान ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी करायला हवं होतं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे काँग्रेसचं काम आहे, अशी टीका लाड यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती”

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब आजही जिवंत आहेत- उर्मिला मातोंडकर

शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु- प्रसाद लाड

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या