बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…वेळ आली तर सेनाभवन फोडू- प्रसाद लाड

मुंबई | वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजीं निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसचं खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. एवढी तुमची आमची भीती की ह्यांना असं वाटतं हे माहिममध्ये आले की सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुया, असं प्रसाद लाड यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपानं सुद्दा शाखेच्यामध्यामातून समाज सेवाचं करावी. त्यांनी कार्यालय युद्ध खेळण्यासाठी नाहीय हे समजावं. भाजपचे नेते या आधीही सेनाभवनावर भुंकले होते. शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांचं कोणी वाकड करु शकत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने नाराज असलेल्या बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला अलविदा!

महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

श्रीलंका दौरा संपवून भारतात परतणाऱ्या ‘या’ 3 भारतीय क्रिकेटपटूंना सरकारने परवानगी नाकारली

मुंबईची कोरोना रूग्णसंख्या आली आटोेक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More