विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे प्रसाद लाड विजयी

मुंबई | विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. त्यांना 209 मतं मिळाली आहेत. लाड यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केलाय. त्यांना 73 मतं मिळालीयेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी निवडणूक पार पडली होती.

नारायण राणे यांचे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघड केलं होतं. छगन भुजबळ आणि अर्जुन खोतकर यांना मतदान करता आलं नव्हतं. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच नोटाचा पर्याय वापरण्यात आला होता.