बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणुन एवढे वर्ष मिठी नदी साफ केली नाही’; वाझे प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या अडचणीत आता वाढ होताना पाहायला मिळत आहे. एनआयएच्या हाती मुंबईतील मिठी नदीतुन नवीन पुरावे हाती लागल्याने एकच खळबळ माजली आहे. या सर्व प्रकरणात आता शिवसेनेवर भाजपने टिकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकरणी शिवसेनेवर टिकेचे बाण सोडले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक काल संध्याकाळी बीकेसी परिसरातील मिठी नदी पात्रात तपासासाठी आलं असताना त्यांच्या हाती मोठे पुरावे लागल्याचं दिसून आलं. मिठी नदीपात्रात उतरून सर्च ऑपरेशन सुरू असताना काही सीपीयू, नंबर प्लेट आणि डीव्हीआरचे काही पार्ट या नदीपात्रात सापडल्याने आता यावरून राजकीय वर्तुळात टीकेला उधाण आलं आहे. शिवसेनेनं आपलं पाप जनतेसमोर उघड होईल, म्हणुन एवढे वर्ष मिठी नदी साफ केली नाही, असा टोला आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेनेचं पथक सचिन वाझेला वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी घेऊन गेलं आणि यावेळी शोध मोहीम सुरू असताना धक्कादायक गोष्टी आढळून आल्याने खळबळ माजली आहे. प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

मनसुख हत्या प्रकरणामध्ये आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेचा थेट संबंध असल्याचे बरेचसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले.

थोडक्यात बातम्या

‘ही’ प्रसिद्ध मराठी गायिका धरणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट

‘बांगलादेश मुक्तीलढ्यात पंतप्रधानांना कोणत्या जेलमध्ये ठेवलं होतं?’; जयंत पाटलांचा मोदींना टोला

वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं तेव्हाच सांगितलं होतं की…- संजय राऊत

सचिन वाझे कोणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करायचे?-नारायण राणे

रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More