Top News

“मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला मुख्यमंत्रीच जबाबदार”

रत्नागिरी | राज्य सरकार कोरोनाच्या बाबातीत निर्णय घेण्यास अपयशी ठरलंय. तसेच मुंबईतील कोरोनाच्या दयनीय अवस्थेला राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय कोण घेतं, हेच कळत नाही. मुंबईत सध्या समन्वय न साधता लोकांचा छळ आणि पिळवणूक करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

मुंबईतील लॉकडाऊन उठवण्याची गरज नव्हती. आम्ही वेळोवेळी सांगतोय लॉकडाऊन उठवू नका, पण सरकारने ऐकलं नाही. आता जनतेच्या रागाचा बांध फुटायची वेळ आली असल्याचं मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचं दीड ते दोन हजार कोटीचं नुकसान झालं आहे. सरकार बांधावर गेले नाहीत, की बंदरावर गेले नाहीत, असं सांगत प्रसाद लाड यांनी कोकणातल्या निसर्ग चक्रीवादळाच्या मदतीवरुन सरकारवर निशाणा साधलाय.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

पुण्यात आजही नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ, दुसरीकडे डिस्चार्जची संख्याही मोठी

राज्यात आजही 5 हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद, जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या