बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय”

मुंबई | भाजपला पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यालाच भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय, असा टोला प्रसाद लाड यांनी अजित पवारांना लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून, सरकारने कितीही प्रयत्न केले तरही आंदोलने होणारच, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारकडून सूडबुद्धीचे राजकरण केले जात असल्याचा आरोपही लाड यांनी केलाय.

ट्रेंडिंग बातम्या- 

“बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का?”

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे, मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे- रामदास आठवले

महत्वाच्या बातम्या- 

“शिवसेना-भाजपने एकत्र यावं, आपण मिळून सरकार स्थापन करु”

अमेरिकन लोकांनी भारताविषयी गुगलवर सर्च केलेले प्रश्न वाचून डोक्याला हात लावाल!

देशाला गुजरातचे दंगल मॉडेल नकोय- जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More