मुंबई | महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपवरही त्यांनी पत्रकार परिषदेमधून टीकेचे बाण सोडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नवाब मलिकांवर सडकून टीका केली आहे.
‘मध्ययुगीन भारतात अनेक नवाब होऊन गेले तसेच त्यांना जनतेची काळजी आणि कळवळा होता, पण आताच्या नवाबाला फक्त जावयाची काळजी आहे’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर नवाब मलिक हे आपल्या राजाचं राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.
इतिहासातील मलिक अंबर यांचा संदर्भ देत मलिक अंबर यांना जनतेची काळजी, कळवळा, कणव होती. पण आताच्या मलिकांना कुणाचीही अजिबात पर्वा नाही, सर्व काही बाजूला ठेवून फक्त जावयाला वाचवणे आणि अधिकाऱ्यावर खोटे आरोप करणे हा एककलमी कार्यक्रम राबवला जात असल्याचा टोलाही प्रसाद ला़ड यांनी नवाब मलिकांना उद्देशुन लगावला आहे.
‘मलिक अंबर हे व्यसनांच्या विरोधात होते, पण नवाब मलिक हे व्यसनांशी लढणाऱ्यांच्या विरोधात आहेत’, असं म्हणत या मलिकांना पाहून स्वर्गातील मलिक अंबर अश्रू ढाळत असणार, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या –
“आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो”
“राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे”
अजित पवारांना आणखी एक धक्का, कुटूंबातील ‘या’ व्यक्तीच्या घरी ईडीची छापेमारी
पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना, ऐन सणासुदीत सर्वसामान्य नागरिक त्रस्त
आता बेडवर पडून निवांत झोप काढण्याचेही मिळणार लाखो रुपये
Comments are closed.