बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“झोपडपट्टीमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचं पाप; महापालिका निवडणुकीत यांना कठोर शिक्षा द्या”

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासुन पावसाने दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता पावसाने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली आहे. त्यातच काल मुंबईमध्ये दरड व संरक्षक भिंत कोसळुन तब्बल 33 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  तसेच या प्रकरणामुळे राज्य सरकारसह मुंबई महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना पाहायला मिळत आहे.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मुंबईतील झोपडपट्टीत जाणारे बळी हे शिवसेनेचं पाप आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. दर पावसाळ्यात मुंबईत जाणाऱ्या मृत्युला शिवसेनाचं जबाबदार असल्याचं म्हणत गेली 25 वर्षे महापालिकेत सत्ता असताना झोपडपट्टीतील नागरिकांची सन्मानाने जगण्याची व्यवस्था करणं ही शिवसेनेची जबाबदारी होती, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.

‘शिवसेनेच्या पापाची कठोेर शिक्षा त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत द्या’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. कंत्राटदार व शिवसेनेच्या हितसंबंधामुळे मुंबईतील सामान्य नागरिकांच्या नशिबी तुंबलेले व खड्डेमय रस्ते आले आहेत, असं देखिल यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मतांसाठी शिवसेनेनं कोणतेही काम मार्गी लावले नाही, तसेच झोपडपट्ट्यांमधील नागरिकांच्या  सन्मानाने जगण्याची सोय करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकली असती तसेच यामुळे वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांवर नियंत्रण मिळवता आलं असतं, पण फक्त मतांमुळे त्यांनी गेले 25 वर्ष सर्वाधिक नगरसेवक असतानाही हे केलं नसल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या  – 

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

चुकीला माफी नाही!, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More