महाराष्ट्र मुंबई

“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”

Photo Credit- Facebook/ Nana Patole, Prasad Lad

मुंबई | आयसोलेशनमध्ये असतानाही जुहू येथील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने भाजप नेते प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सकाळी आयसोलेशन आणि रात्री सेलिब्रेशन. नानाच्या नाना तऱ्हा, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंवर टीका निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही काल शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. त्यावरून  प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केलीये.

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन! हाच आहे काँग्रेसचा तमाशा… स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना 144 कलम लावून अटक करायचं, अशी टीका करतानाच नानाजी मांजरा सारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय!, असा टोला लाड यांनी नाना पटोलेंना लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”

मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!

कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या