“मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे”
मुंबई | प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारी 2021 ला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्याने खळबळ माजली होती. स्फोटक ठेवल्यानंतर संंबंधित आरोपी ज्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीमध्ये गेले ती गाडी मुंबई पोलिसांची असल्याची माहिती समजत आहे. या प्रकरणातील संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने केलेल्या चौकशीनंतर अनेक गो गोष्टींचा उलगडा होत आहे. यानंतर मात्र विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
याआधी मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी सचिन वाझेंची बाजू घेत तपासानंतर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडलं पाहिजे. सचिन वाझेंच्या माध्यमातून अजून किती लोकांच्या हत्या केल्या गेल्या याची देखील खात्री एनआयएने केली पाहिजे अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे.
आत्ता संशयित म्हणून एका सचिन वाझेला अटक झाली आहे.परंतु राज्यातील आत्महत्यांच्या इतर प्रकरणांचे काय? @NIA_India ने महाराष्ट्रात झालेल्या इतर आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे. @BJP4Maharashtra @abpmajhatv @zee24taasnews @MiLOKMAT @mataonline @TheMahaMTB @LoksattaLive pic.twitter.com/bhunYkVAHZ
— Prasad Lad (@PrasadLadInd) March 14, 2021
थोडक्यात बातम्या-
सोने इतक्या हजारांनी स्वस्त; जाणुन घ्या आजचा भाव!
महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी- चंद्रकांत पाटील
अंबानी स्फोटकं प्रकरणातील ‘ती’ कार मुंबई पोलिसांची; एनआयएच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर!
“सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”
“दैव जाणिले कुणी?” या उक्तीप्रमाणे ते चौघे मरणाच्या दारातून परतले, पाहा व्हिडिओ!
Comments are closed.