महाराष्ट्र मुंबई

‘या’ भाजप नेत्याची चौकशी होणार; मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. टीव्ही 9 मराठीने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

प्रसाद लाड यांनी 2009 साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 2014 साली त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत”

नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत- बाळासाहेब थोरात

‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या