मुंबई | विरोधी पक्षातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यातील 5 ते 6 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अनेक आमदारांना भाजपमध्ये यायचं आहे. पण पक्षात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री घेणार आहेत, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर आघाडीतील नेमके कोणते आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे संकेत प्रसाद लाड यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–…नाहीतर लोकांना तुमची धुलाई करायला लावेल- नितीन गडकरी
-बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!
-“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे
-“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”
-राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन
Comments are closed.