मुंबई | आज आपल्या हिंदुत्वावर संकट ओढावलेले दिसत असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता?, असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केला आहे.
सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा लागू करावा आणि लव्ह जिहाद सारख्या या धर्मसंकटातून आपल्या महाराष्ट्रातील लेकी-बाळींचं, माता-भगिनींचं रक्षण करावं, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केलीये.
बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणं आहे, असं प्रसाद लाड म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार!
“राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही”
“मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”
मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!
भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील