महाराष्ट्र मुंबई

“बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे”

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचं श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे. काही तासातच एनडीए 130 च्या वर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल, असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

बिहारमधील निवडणुकांच्या निकालाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन प्रसाद लाड यांनी केलं. ते  ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

एक्झिट पोलमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला, असं प्रसाद लाड म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी”

बिहार निवडणूक निकाल- चिराग पासवान किंग मेकर ठरणार का?

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या