बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

मुंबई | रेमडेसिवीरचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पडसाद राज्याचा राजकारणात उमटले. विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी यावरून राज्य सरकरावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठाी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी फडणवीस अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांना सुनावलं. रविवारी डोकामिया यांना सोडून देण्यात आलं मात्र यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. लाड यांनीही यावरूनच सरकारवर टीका केली.

या तिघाडी सरकारने सर्व सीमा ओलांडल्या आहेत. स्वतः काही करायचं नाही. भाजप जनतेचा पक्ष म्हणून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्रातील जनतेसाठी आणणार याचा राग म्हणून की काय राजकीय आकसाने आज हे कृत्य करून तुम्ही चुकलात.. याची किंमत मोजावी लागणार!, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान,महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूनं आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारनं केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

दिवसभरात फक्त 2 लवंग खा… होतील विश्वास बसणार नाहीत इतके फायदे

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार?

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More