बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा उधान

मुंबई | मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. त्यांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. राज्यात बऱ्याच दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा चालू आहेत. या चर्चा सुरु असतानाच प्रसाद लाड आणि राज ठाकरेंच्या भेटीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी मुंबई जिल्हा बॅंक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांची, त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत सहकार्य करण्यासंदर्भात भेट घेतली!, असं ट्विट लाड यांनी केलं आहे.

मुंबई जिल्हा बॅंक निवडणूकीच्या निमित्तानं सहकार पॅनल स्थापन करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये राज ठाकरे यांनी सामील व्हावं, यासाठी प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर मात्र राजकीय चर्चांना उधान आलं असून मनसे-भाजप युतीचा मुद्दा केंद्रस्थानी आला. त्यांच्या भेटीनंतर भाजप-मनसे जवळीक वाढली असून त्यांची युती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

अंबानींची दर्यादिली; सामाजिक कार्यावर खर्च करण्यात रिलायन्स अव्वल

“ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती”

“मी उत्तर दिल्यावर चंद्रकांत पाटलांची तब्येत बिघडेल”

“शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”

“…त्यामुळे शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More